सोलापूर : रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे सध्या सोलापूर दौऱ्यावर असून ते आज शेतकरी मेळाव्याला हजर राहणार आहेत. त्यापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सदाभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले असून त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे, असा घणाघातही त्यांनी केला. दरम्यान, सदाभाऊंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
यावेळी बोलत असतांना सदाभाऊ खोत म्हणाले की,‘शरद पवार हे महान नेते असले तरी त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीच केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मला वाटते शरद पवार यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे,’ असे आवाहनही यावेळी सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या
- तारखेत काय ठेवलंय? म्हणत वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत खास…”
- अभिनेता शरद केळकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
- “सातारा येथे केंद्रीय विद्यालय स्थापन करावे”, श्रीनिवास पाटलांची मागणी
- “…आता ही अर्थपूर्ण सुबुद्धी कशी काय सुचली बुवा?”, भातखळकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल
- “प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ” – आदित्य ठाकरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<