जंगी सभेच्या आधीच सदाभाऊंना आली चक्कर; सभा एका तास पुढे ढकलली

कोल्हापूर : सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते सदाभाऊ खोत यांच्या जंगी सभेकडे. याच सभेमध्ये सदाभाऊ हे आपल्या नवीन शेतकरी संघटनेची घोषणा करणार आहेत. मात्र सदाभाऊ खोत यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे, त्यांना अचानक चक्कर आल्याने ते शासकीय विश्रामगृहात आराम घेत आहेत. त्यामुळे कोल्हापुरमध्ये होणारी सभा एक तास पुढे ढकलण्यात आली आहे.

bagdure

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सदाभाऊ हे आपली नवीन राजकीय इनिंगची सुरुवात करत आहेत. आज कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सभेत ते शेतकरी सघटनेच्या नावाची घोषणा करणार असून राज्य कार्यकारणीही जाहीर केली जाईल. दरम्यान आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते त्यांच्या सभेकडे.

 

 

You might also like
Comments
Loading...