fbpx

सांगली जिल्ह्यातील रेल्वे कामासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

Sadabhau-Khot-

मुंबई : पुणे-सांगली-कोल्हापूर रेल्वेमार्गावर सांगली जिल्ह्यातील भवानीनगर (ता. वाळवा) येथे रेल्वे मार्गाखाली पूल (अंडरब्रीज) बांधण्याच्या मागणीसह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

यावेळी श्री. गोयल यांनी या मागणीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन सकारात्मक असल्याचे श्री.खोत यांना सांगितले. याबद्दल श्री. खोत यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानून पुढील कार्यवाही लवकर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

1 Comment

Click here to post a comment