माढ्यातून सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा

sadabhau-khot-

करमाळा- आगामी लोकसभा निवडणूकीत माढा मतदार संघातून भाजप कडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यामुळे माढ्याचा तिढाही सुटणार आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेकडून माजी खासदार कै प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर भाजप कडून राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

२०१४ लोकसभेला राष्ट्रवादी कडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील तर भाजप-शिवसेना-स्वाभिमानी महायुती कडून सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत निवडणूकीच्या रिंगणात होते त्यावेळी मोदी लाट असूनही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. त्यावेळी सदाभाऊ खोत हे महायुती कडून असल्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार दिलेला नव्हता परंतु सध्याची परिस्थिती पहाता उध्दव ठाकरे यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केल्याने माढा मतदारसंघातून भाजपला ही जोरदार तयारी करावी लागणारा आहे, कुठल्याही परिस्थितीत माढा मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचा कल असेल, त्या दृष्टीने भाजपची सध्या चाचपणी सुरू असून सदाभाऊ खोत हेच उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माढा मतदार संघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, माळशीरस,करमाळा, तर सातारा जिल्ह्यातील फलटन आणि माण तालुक्याचा समावेश आहे.

सदाभाऊ खोत आणि सुभाष देशमुख यांच्या पेक्षा दुसरा तगडा उमेदवार भाजपकडे नसल्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सुभाष देशमुख सध्या राज्याच्या राजकारणात राहण्यात रस दाखवित असल्यामुळे तसेच भाजपकडे दुसरा तगडा उमेदवार नसल्यामुळे सदाभाऊ खोत यांचे नाव सध्यातरी आघाडीवर आहे.

दोषी आढळल्यास मंत्रिपद सोडेल- सुभाष देशमुख

पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे-खोत