आंदोलनाच्या शाळेतील मी पहिला मास्तर आहे : सदाभाऊ खोत

कोडोली : आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. ऊस दराबाबत आंदोलन करायची गरजच या सरकारने ठेवली नाही. त्याआधीच आम्ही एफआरपी रक्कम अधिक दोनशे रूपयांचा दर जाहीर करत आहे. आज तुम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चद्रकांतदादा पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मी हे सांगत आहे. यावरून हे सरकार किती संवेदनशील आहे हे तुमच्या लक्षात येईल. मात्र, यानंतरही काही जण आंदोलन करतील व श्रेयाची लुटपूटूची लढाई करतील, असे सांगत राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता ते आंदोलन करतील हे तुम्हाला कसे माहित असे उपस्थित शेतकरी बांधवांना प्रश्न पडेल, पण लक्षात ठेवा या आंदोलनाच्या शाळेतील मी पहिला मास्तर आहे, असेही खोत यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वारणा – कोडोली येथे पार पडलेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली. कोडोलीत रयत क्रांती संघटनेचा पहिला वर्धापन दिन आणि ऊस परिषदेच्या निमित्ताने कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं . मंत्री खोत हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.

ऊस दराबाबत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, पूर्वी ऊसाचा दर ठरविण्यासाठी आम्हाला आठवडा – पंधरवडा आंदोलने करावी लागत असत. मग कुठे सहकार मंत्री दखल घ्यायचे. मग त्यांच्याशी बोलणी सुरू करायची. मग ते राज्याच्या प्रमुखाकडे म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे. मग कुठे दराबाबत चर्चा व्हायची आणि हातात काय पडायचे तर एफआरफीची रक्कमही मिळायची नाही अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.शरद जोशी यांच्या संघटनेत उडी घेतल्यानंतर गेली 30 – 32 वर्षे मी शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी काम केले. वाड्या – वस्तीवर गेलो. पायाला फोड आले, पण आम्ही कधी जाहिरातबाजी व फोटोबाजी केली नाही. कारण आम्ही काम करणारे व चळवळीतील कार्यकर्ते होतो. याच जीवावर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद बहाल केले. मात्र मी मंत्री होताच यांच्या पोटात दुखू लागले. मी मोठा होईल असे संकुचित मनाच्या नेत्याला वाटू लागले. स्वत:च्या स्वार्थासाठी मला मंत्रिपदावरून हाकला नाहीतर युतीतून बाहेर पडेन असे ते मुख्यमंत्र्यांना धमकावू लागले. पण फडणवीस यांना सर्व माहीत होते. त्यांनी माझी पाठराखण केली. त्यामुळे आज मी मंत्रिपदावर आहे अशा शब्दांत खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर नाव न घेता टीका केली.

मराठा आदोलकांनी राजू शेट्टींना पळवून लावले

शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- खासदार राजू शेट्टी

अखेर मांजरम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास मिळाले पशुधन विकास अधिकारी