मुंबई : राज्यात सध्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट आले आहे. यातच सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. तसेच शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये मतदानाचा हक्क दिल्याने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
“जनतेच्या हिताचे निर्णय या दोन माणसांनी घेतले. चाळीस मंत्री हे मंत्री मंडळात असतात. पण आता या वाडप्यांची गरज दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीच चांगले निर्णय घेतले आहेत. हे या निर्णयातून समजून येत आहे. त्यामुळे ही दोन माणसं सुद्धा महाराष्ट्राला पोट भर जेवायला वाढू शकतात”, या शब्दात सदाभाऊ खोत यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- India vs England, 2nd ODI | रोहित शर्माने टॉस जिंकला, भारत करेल प्रथम गोलंदाजी
- Navneet Rana : ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं; नवनीत राणांची सडकून टीका
- Jayant Patil | “कोकणात आल्यानंतर शरद पवारांच्या गाडीत बसून…” ; जयंत पाटलांचा केसरकरांवर घणाघात
- Sanjay Raut : आमच्या खासदारांचा आकडा जसाच्या तसा राहील; संजय राऊतांचा उदय सामंतांवर पलटवार
- Pratap Sarnaik | “उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताला आले नाही…”- प्रताप सरनाईक
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<