Share

Sadabhau Khot | “राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद”वरुन वाद; सदाभाऊ यांचं स्पष्टीकरण

Sadabhau Khot | पुणे : अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी’ हा कार्यक्रम पुण्यात पत्रकार भवनात आयोजित केला होता. पुण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमात बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली. राज्यकर्ते रेड्यांची औलाद आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.

सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यामुळे यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला असून त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आज सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी केलेलं विधान फार मोठा नाही, असे त्यांनी म्हणाले आहेत.

सदाभाऊ खोत म्हणाले की, मी राजकारणी आहे. ते बोलताना मला काही शंका आली नाही. ज्यांच्या मनात शंका येऊ शकते त्यांच्या मनाला हा शब्द लागू शकतो. तुम्ही तुमचे प्रश्न राजकारण्यांच्या समोर बोललं पाहिजे असा माझा हेतू होता. राज्यात, देशात शेतकरी, बेरोजगार लोक आत्महत्या कोणामुळे करत आहेत याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे

नेमकं काय म्हणालेत सदाभाऊ खोत?

राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं.

Sadabhau Khot | पुणे : अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी’ हा कार्यक्रम पुण्यात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now