त्यांनी १५ वर्षात कामे केली असती तर दुष्काळ हटला असता :  सदाभाऊ खोत 

बुलडाणा : सत्तेत असताना गेल्या १५ वर्षात कामे केली असती तर राज्यातील दुष्काळ हटला असता असा  सणसणीत टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. दोन दिवसापूर्वी चिखलीतील एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले असता राज्यात दुष्काळ सदृश्य नव्हे तर दुष्काळच असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यानुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केले.

नेमकं काय म्हणाले खोत ?

आपल्या सारख्या सामान्य माणसाने शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही. ते जेष्ठ नेते आहेत. शासन, प्रशासनाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याचे नियम व अटी त्यांना माहित आहे. दुष्काळ कधी जाहीर करावा लागतो, याचीही त्यांना कल्पना आहे.त्यांनी  १५ वर्षामध्ये योग्य काम झाले असते तर बर्यापैकी राज्यातील दुष्काळ हटला असता .