शेतकऱ्याला गुलाम बनवणाऱ्यांच्या दावणीला परत बांधणार असाल तर शेतकरी शांत राहणार नाही

सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

टीम महाराष्ट्र देशा: चळवळ ही आमदार, खासदार करण्यासाठी वाढवली असेल तर आत्तापर्यंत लढणारे कार्यकर्ते हे वाट चुकलेले होते की काय ? शेतकऱ्याला गुलाम बनवणारी मंडळीपासून मुक्त होण्यासाठी लढणाऱ्या जनतेला परत त्यांच्या दावणीला कोणी नेऊन बांधणार असेल तर शेतकरी शांत राहणार नाही, असा इशारा मंत्री खोत यांनी दिला. तर तुम्ही आता कोणाला मदत करत आहात हे स्पष्ट झाले आहे. असा टोला कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कऱ्हाडात केली.

लग्न झाल्यावर ऐन मांडवातुन आम्ही पळुन जाणारे आम्ही नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुका आम्ही भाजपबरोबर राहूनच लढणार आहोत, अशी घोषणा सुद्धा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कऱ्हाडात केली.

You might also like
Comments
Loading...