fbpx

शेट्टी चळवळीमधून पराभूत व्हावेत हे मला वाटत नाही, त्यांनी युतीत परत यावे – सदाभाऊ खोत

टीम महाराष्ट्र देशा : राजू शेट्टी हे शेतकरी चळवळीमधून पराभव व्हावेत हे मला वाटत नाही. परंतु त्यांची वाट चुकली आहे. तसेच ते हुशार राजकारणी आणि पुढचे भविष्य जाणणारे नेते आहेत. त्यांनी आज ही युतीमध्ये यावे असे मत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, पण हुजऱ्याचे ऐकून लढणारे माणसांना मातीत घालण्याचे काम राजू शेट्टी यांनी केल. असा घणाघात देखील खोतांनी यावेळी शेट्टीवर केला. तसेच आम्हाला यावेळी शेतकरी चळवळीचा पराभव करायचा नव्हता. तर व्यक्तीचा पराभव करायचा होता अस मत देखील यावेळी खोतांनी व्यक्त केले.

राजू शेट्टींंना विजयाचा गुलाल ही आम्हीच लावला आणि पराभवाचा गुलाल ही आम्हीच लावला. ही परिस्थिती त्यांनी निर्माण केली. राजू शेट्टी यांनी चुक मान्य करावी आणि परत आमच्याकडे यावे. अस मत मंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडले आहे. ते सांगली मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.