‘मैदान ठरवा , लढाईसाठी सदाभाऊ कधीही आणि कुठेही तयार आहे’

sadabhau khot

परभणी : ‘माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी मैदान ठरवावे, मी आखाड्यात उतरण्यास तयार आहे’ असे थेट आव्हान राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पाथरीत दिले.

खासदार राजू शेट्टी यांच्या टीकेचा समाचार घेताना त्यांनी ‘मैदान ठरवावे, लढाईसाठी सदाभाऊ कधीही आणि कुठेही तयार आहे’ असे प्रति आव्हानच दिले. त्यांच्या पोकळ इशाऱ्याना आपण भीक घालत नसून मंत्री पद आज आहे उद्या नाही, परंतु सदाभाऊ कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत राहील असे देखील त्यांनी सांगितले.