सदाभाऊंची बहुचर्चित रयत क्रांती संघटना

वेब टीम ;राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज कोल्हापुरात नव्या संघटनेची घोषणा केली . रयत क्रांती संघटना, असे त्यांच्या नव्या संघटनेचे नाव आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली .

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांत त्यांन पश्चिम महाराष्ट्रात आपली गट बांधणी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी नव्या संघटनेची घोषणा करण्याचे जाहीर केले होते.