सदाभाऊ खोत घेणार राज्यपालांची भेट,’ही’ महत्वाची मागणी करणार

sadabhau khot

मुंबई – राज्यावर पुन्हा टाळेबंदीचे ढग दाटून येवू लागले आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.

टाळेबंदी जाहीर करत नाही पण काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावेच लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील असं त्यांनी काल समूहमाध्यमावरून राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादात सांगितलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करतही आहोत. परंतु आजचे कोरोना नामक राक्षसाचे आक्राळविक्राळ रुप पाहिले तर आपण उभ्या केलेल्या आरोग्य सुविधा कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आपण लॉकडाऊन टाळू शकतो त्यासाठी जिद्दीने आणि स्वयंशिस्तीने सर्वांनी एकत्र येत पुन्हा एकदा हातात हात घालून कोरोनाविरुद्ध लढूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात दृष्य परिणाम दिसले नाही तर सर्व तज्ज्ञ आणि संबंधितांशी चर्चा करून इतर पर्यायांची माहिती घेऊन नवीन कडक नियमावली जाहीर केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती मंडळाचं शिष्टमंडळ आज संध्याकाळी 5 वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. लॉकडाऊन न करण्याची विनंती राज्यपालांना करण्यासाठी खोत ही भेट घेणार आहेत.  लॉकडाऊन केल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक कामगार, श्रमिकांच्या खात्यावर 10 हजार रक्कम जमा करावी  अशी मागणी ते करणार आहेत. शेतकरी आणि मत्स्यशेती करणाऱ्या मच्छिमारांसाठी आधी उपाययोजना कराव्या तसेच महाराष्ट्रातील कामगाराला आर्थिक मदत देऊनच लॉकडाऊन जाहीर करावा ही मागणी ते करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या