मी माढ्यात पाच लाख मते घेतली,त्यांनी सांगलीत लढून दाखवावं ,खोतांचं शेट्टींना आव्हान

कोडोली : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वारणा – कोडोली येथे पार पडलेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघात 200 किमी दूरवर मी फडणवीसांच्या आदेशाने लढलो. शेतक-यांसाठी केलेल्या कामाच्या जोरावर मी 4 लाख 80 हजार मते घेतली व निसटता पराभव झाला. पण यांनी हतकणगंले सोडून शेजारच्या सांगलीत जाऊन लढण्याची धमक दाखवावी व माझ्याएवढी मते घेऊन दाखवावीत, असे शेट्टींचे नाव न घेता त्यांना आव्हान दिले.

सदाभाऊ खोत म्हणाले, शरद जोशी यांच्या संघटनेत उडी घेतल्यानंतर गेली 30 – 32 वर्षे मी शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी काम केले. वाड्या – वस्तीवर गेलो. पायाला फोड आले, पण आम्ही कधी जाहिरातबाजी व फोटोबाजी केली नाही. कारण आम्ही काम करणारे व चळवळीतील कार्यकर्ते होतो. याच जीवावर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद बहाल केले. मात्र मी मंत्री होताच यांच्या पोटात दुखू लागले. मी मोठा होईल असे संकुचित मनाच्या नेत्याला वाटू लागले. स्वत:च्या स्वार्थासाठी मला मंत्रिपदावरून हाकला नाहीतर युतीतून बाहेर पडेन असे ते मुख्यमंत्र्यांना धमकावू लागले. पण फडणवीस यांना सर्व माहीत होते. त्यांनी माझी पाठराखण केली. त्यामुळे आज मी मंत्रिपदावर आहे अशा शब्दांत खोत यांनी शेट्टी यांचा उल्लेख न करता टीका केली.

जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाने महिन्याला संयुक्त बैठक घ्यावी – सदाभाऊ खोत