आज नाही तर २१ जुलैला आपली भूमिका स्पष्ठ करणार – सदाभाऊ खोत

सदाभाऊंचा साभिमानीच्या चौकशी समितीला निरोप

वेबटीम : सदाभाऊ खोत हे शेतकरी कर्जमाफी तसेच इतर विषयांमध्ये संघटने विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. तसेच नजीकच्या काळामध्ये खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच देखील पहायला मिळाल होत . याच दरम्यान सदाभाऊंच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी मागील महिन्यात पुण्यामध्ये संघटनेची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीत कोणताच ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. या बैठकीत एक चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच ४ जुलै पर्यंत सदाभाऊनी चौकशी समितीला समोर जाऊन आपली भूमिका स्पष्ठ करण्यास सांगण्यात आल होत.

आज पुण्यामध्ये या समितीची बैठक बोलावण्यात आली. मात्र, सदाभाऊ खोत यांनी या अनुपस्थित राहत चौकशी समितीला निरोप पाठवला आहे . यामध्ये आपण आपल म्हणन  २१जुलैला मांडणार असल्याच त्यांनी सांगितल आहे . त्यामुळे आजही कोणताच ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. तसेच आता २१ तारखेला तरी सदाभाऊ आपली भूमिका मांडणार का याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.

You might also like
Comments
Loading...