जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाने महिन्याला संयुक्त बैठक घ्यावी – सदाभाऊ खोत

Sadabhau-Khot

सांगली : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने समन्वयाने काम करावे. दोन्ही यंत्रणांनी महिन्यातून एकदा संयुक्तरीत्या बैठक घ्यावी, असे प्रतिपादन पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे केले. अनिकेत कोथळे प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

Loading...

अनिकेत कोथळे प्रकरण क्रूर, अमानवीय व निंदनीय आहे. याचा तपास मुळापासून, निपक्षपातीपणे आणि पारदर्शी होणे गरजेचे आहे. याची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे, असे स्पष्ट करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, अशा घटना भविष्यात घडू नये, म्हणून आपण सर्वांनी दक्ष राहावे.

जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाची महिन्यातून एकदा संयुक्त बैठक घ्यावी. यामध्ये पोलीसांनी महिनाभरात केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. तसेच, नागरिक व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होण्याकरिता प्रयत्न केला जाईल. भविष्यकाळात कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांच्या तक्रारींची पोलीस प्रशासनाने दखल न घेतल्यास त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दंडाधिकारी म्हणून दिलेल्या अधिकारांचा योग्य उपयोग करावा. अशा घटना टाळण्यासाठी त्यांनी दक्ष राहावे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तसेच पोलीस यंत्रणांनी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी नियमित आढावा घ्यावा.

तसेच, हद्दपारीची प्रकरणे विहित मुदतीत निकालात काढावीत. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अनिकेत कोथळेच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच, आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही दिली.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...