दु:खद! अर्जुन पुरस्कार प्राप्त बॅडमिंटनपटू नंदु नाटेकर यांचे निधन

दु:खद! अर्जुन पुरस्कार प्राप्त बॅडमिंटनपटू नंदु नाटेकर यांचे निधन

मुंबई : बॅटमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव पोहचवणाऱ्या नंदू नाटेकर यांचे २८ जुलै रोजी वृद्धपकाळाने येथे निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. पुणे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना बॅडमिंटनचे महर्षी म्हणून ओळखले जायचे.

सांगली जिल्ह्यात जन्म झालेल्या नंदु नाटेकर यांचे प्राथमिक शिक्षण हे मुंबईत झाले. पहिल्या वहिला अर्जुन पुरस्कार पटकावणारे म्हणून ते ओळखले जातात. हा पुरस्कार त्यांना १९६१ साली देण्यात आला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शंभरपेक्षा सामन्यात विजय मिळवला आहे. १९६५ साली जमैका येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. १९६१ साली त्यांची निवड सर्वाधीक लोकप्रिय खेळाडू म्हणून झाली होती.

थॉमस करंडक स्पर्धेत त्यांनी १९५९, १९६१ आणि १९६३ साली भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते. बॅडमिंटनमध्ये त्यांच्या दिलेल्या योगदानामुळे त्यांना बॅडमिंटन महर्श्री म्हणून ओळखले जायचे. भारताला क्रीडा क्षेत्रात सर्वात आधी ओळख निर्माण करुन देणारे म्हणून नंदु नाटेकर ओळखले जातात. लोकप्रियतेमुळे त्यांचा दबदबा जाहीरात क्षेत्रातही होता. त्याच्या निधनांने क्रिडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या