गेम ओवर…! गणेश गायतोंडे वापस आ गया..

टीम महाराष्ट्र देशा- नेटफ्लिक्सवरची भारताची पहिली ओरिजनल क्राईम वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनची प्रतीक्षा करणा-या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर रिलीज झालाय. येत्या 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होणार आहे.

Loading...

पहिल्या भागामधील सैफ अली खान (दिलबाग सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतीन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा अध्यात्मिक गुरु) हे कलाकार पुढच्या भागातही दिसणार आहेत. त्याचसोबत अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी या दोन नवीन कलाकारांची भर पडली आहे.

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं होतं. यंदा हा सीझन अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी दिग्दर्शिक केला आहे. पहिला सीझन संपल्यानंतर पुढे काय होणार या प्रश्नाने सर्व प्रेक्षकांना व्याकुळ केले होतं. मात्र आता 15 ऑगस्टपासून या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.Loading…


Loading…

Loading...