fbpx

सेक्रेड गेम्स 2 : ‘बलिदान देना होगा’ मीम्सचा दिल्ली मेट्रोकडून सोशल मिडीयावर वापर

टीम महाराष्ट्र देशा : नेटफ्लिक्सवरची भारताची पहिली ओरिजनल क्राईम वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या सिरीजचे अनेक मीम्स सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून सोशल मिडियावर प्रवाशांच्या हितार्थ  या मीम्सचा वापर अनोख्या अंदाजात करण्यात आला आहे तर सध्या सोशल मिडीयावर याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

येत्या १५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स २’ रिलीज होणार आहे. यातील नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे) याचा तिसरा बाप (गुरु) पंकज त्रिपाठीचा ‘बलिदान देना होगा’ या मीम्सचा वापर करून दिल्ली मेट्रो प्रशासनाने एक ट्विट केलं आहे.

जेव्हा तुम्ही आरक्षित जागेवर बसता..’ असं कॅप्शन देत ‘बलिदान देना होगा’ या आशयाचा मीम्स दिल्ली मेट्रो ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला. दिल्ली मेट्रो प्रशासनाचा हा अनोखा अंदाज नेटकऱ्यांनाही आवडला आहे. ‘दिल्ली मेट्रो सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्ही योग्य व्यक्तीची निवड केली आहे,’ असे म्हणत एका युजरने प्रशंसाही केली आहे.