औरंगाबाद महापालिका बरखास्त करा- आमदार सतीश चव्हाण

औरंगाबाद कचरा प्रश्न

मुंबई: औरंगाबाद कचरा प्रशाने अधिवेशनात चांगलाच पेट घेतला. औरंगाबाद मनपात घडणाऱ्या गोष्टींमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करावा आणि मनपा बरखास्त करावी. अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

सतीश चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री कचर्‍याचा प्रश्न सोडवण्यासाठी जो निधी देणार आहेत, तो खर्च करण्याची व्यवस्था करावी. तसेच खदाणीमध्ये कचरा टाकला तर सहा किमी परिघातील पाणी दुषित होऊ शकण्याची भीती आहे. जसे नरेगाव येथे कचर्‍यामुळे गावकरी त्रस्त झाले, त्याप्रमाणेच खदाणीच्या आजुबाजूला राहणाऱ्या लोकांनाही त्रास होईल.

औरंगाबाद मनपात घडणाऱ्या गोष्टींमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करावा. ही मनपा बरखास्त करावी. एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त या मनपात पाठवा. निवृत्त व्हायला आलेला किंवा शिक्षा म्हणून औरंगाबादला आयुक्त पाठवल्यामुळेच या मनपामध्ये अनागोंदी सुरु आहे. अशी टीका चव्हाण यांनी केली. तसेच घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी औरंगाबाद मनपाचे महापौर व नगरसेवक तीन वेळा परदेशात अभ्यास दौर्‍यासाठी जाऊन आले आहेत. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या नगरसेवक, महापौरांकडून परदेश अभ्यास दौऱ्याचा अहवाल मागून घ्यावा.