सचिन वाझे काळा का गोरा हे माहिती नाही ; फडणवीस आक्रमक

sachin waze

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारीला सापडली होती. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे.

मनसुख हिरेन संशायस्पद मृत्यूप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही कुणाला वाचवत आहात?, असा सवाल गृहमंत्र्यांना विचारला. हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहे. हात बांधून कोणी आत्महत्या करत नाहीत. तसेच क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्वात आधी वाझे पोहोचले कसे? वाझे यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास कस? असा सवाल फडणवीस यांनी केला.

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे आणि मुंबई पोलीस सक्षम आहे. एएनआयकडे तपास देण्याची गरजच नाही, असं सांगताना अर्णवला आतमध्ये टाकलं म्हणून तुमचा त्याच्यावर राग आहे का?, असा सवाल त्यांनी विरोधी पक्षाला केला.

कोण सचिन वाझे? काळा की गोरा आम्हाला माहीत नाही. त्याने काय केलं किती एन्काऊंटर केले त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असं सांगत याप्रकरणाचे माझ्याकडे पुरावे आहेत. सीडीआर आहे. स्टेटमेंट आहे. मी हवेत बोलत नाही. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचे आरोप गंभीरपणे घेतले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या