सचिन वाझेला पुढे भाजपची खासदारकी पक्की; मिटकरींचा भाजपवर प्रहार

sachin vaze

पुणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.

SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.यावरून राजकारण तापायला लागले आहे. भाजपकडून जोरदार टीका केली जात असून, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, सचिन वाझेच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘सचिन वाझे बद्दल अनेक शंका दिसतात. )NIA मुळे 1)प्रत्येक वेळी भाऊ सोबत. 2)आरोपी असुन देखील वाझेंचे राहणीमान. 3)आरोपी सारखी वागणूक नाही. 4)स्वतः जागोजागी पेरलेले संशयास्पद पुरावे 5) मुद्दाम CCTV समोर जाणे. 6)अचानक लेटर बॉम्ब 7)परमवीर चे राजकीय नातलग… पुढे भाजपची खासदारकी पक्की!’ असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :