सचिनच्या दत्तक गावाला ग्रीन पुरस्कार

sachin-tendulkar’s-adopted-village-puttamarajuvari-kandriga-gets-green-award

वेबटीम- महान क्रिकेटर व संसद सदस्य सचिन तेंडूलकरने संसद ग्राम योजनेंतर्गत आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्हातील पुत्तमराजुवरी कंद्रिका हे गाव दत्तक घेतले होते. सचिनने या गावाचा खूप चांगला विकास केला. याच कामाची दखल घेत इंडियन ग्रीन बिल्डिंग असोसिएशन  (आईजीबीसी) ने पुत्तमराजुवरी कंद्रिकाला आंध्रप्रदेश मधील सर्वोत्कृष्ट ग्रीन व्हिलेज म्हणून गौरविले आहे. या पुरस्कारा करीता या गावाचे पहिल्यांदाच ग्रीन ऑडीट करण्यात आले होते.