आपल्या सुरक्षित भविष्यासाठी मतदान करणे गरजेचे – सचिन तेंडुलकर

blank

टीम महाराष्ट्र देशा – आज २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान होत आहे. सेलेब्रिटी, राजकीय नेत्यांसह, वृद्ध मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडत आहे.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासह वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी सचिनची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन यानेही मतदान केले. आपल्या सुरक्षित भविष्यासाठी मतदान गरजेचे आहे. त्यामुळे मतदान नक्की करा, असे आवाहन सचिनने यावेळी केले आहे.

तसेच, मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझं मत मी नोंदवलं आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा.असे ट्विटही सचिन तेंडुलकरने केले आहे.

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

महत्वाच्या बातम्या