VIDEO: स्वप्नांचा पाठलाग करा ,स्वप्न निश्चितच पूर्ण होतील-सचिन

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबाद- मी लहानपणी स्वप्न पाहिलं होतं भारताला विश्वचषक जिंकून देण्याचं जे मी पूर्ण केलं तुम्ही सुद्धा स्वप्नांचा पाठलाग करा ,स्वप्न निश्चितच पूर्ण होतील असा विद्यार्थ्यांना सल्ला माजी क्रिकेटपटू व खासदार सचिन तेंडुलकर याने दिला आहे सचिनने आज आदर्श सांसद ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावाला आज भेट दिली यावेळी गावकऱ्यांशी तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सचिन गावात दाखल होताच गावक-यांनी त्याचे जंगी स्वागत केले. दौऱ्यात सचिनने या गावात झालेल्या विकासकामांची पाहणी केली. सचिनच्या दौ-यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता . खासदार दत्तक ग्रामयोजनेत सचिनने उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गाव दत्तक घेतले आहे.१६ नोव्हेंबर रोजी सचिन या गावाला भेट देणार होता मात्र, काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता. केंद्र शासनाच्या वतीने सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत खासदारांनी एक गाव दत्तक घेवून संबंधित गावाचा चौफेर विकास करणे अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत खासदार सचिन यांनी योजनेअंतर्गत डोंजा गाव दत्तक घेतले आहे.

डोंजा गाव दत्तक घेतल्यापासून गावातील नागरिकांना भेटण्याची खूप इच्छा होती. ती इच्छा आज पूर्ण होत आहे, अशा आशयाचे ट्विट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.