क्रिकेटचा देव १९ डिसेंबर रोजी डोंज्यात

सचिन तेंडुलकर

 उस्मानाबाद-   माजी क्रिकेटपटू व खासदार सचिन तेंडुलकर आदर्श सांसद ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावाला भेट देणार आहेत. मंगळवार १९ डिसेंबर रोजी डोंजा गावाला सचिन भेट देणार आहेत. यावेळी सचिन गावातील विकासकामांच्या पाहणीसोबत गावकरी आणि विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी सचिन या गावाला भेट देणार होते. मात्र, काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता. केंद्र शासनाच्या वतीने सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत खासदारांनी एक गाव दत्तक घेवून संबंधित गावाचा चौफेर विकास करणे अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत खासदार सचिन यांनी योजनेअंतर्गत डोंजा गाव दत्तक घेतले आहे.