निवृत्तीच्या निर्णयाबाबत सचिनने दिला युवराजला ‘हा’ सल्ला!

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा सिंह आणि सिक्सर किंग युवराज सिंग याने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत युवराज ने आपली निवृत्ती घोषित केली. यावेळी युवीच्या आज पर्यंतच्या कारकिर्दीचा जीवनपट दाखवण्यात आला. त्यावेळी युवराज भावूक झाला असून त्याला अश्रू अनावर झाले. यावेळी आजपर्यंतच्या जडणघडणीत अनेकांचा हातभार लागला असे सांगत त्याने आभार मानले.

निवृत्त होण्यापूर्वी युवीनं आवर्जुन तेंडुलकरचा सल्ला घेतला. निवृत्तीचा निर्णय तुझ्यावर आहे, लोकांकडे लक्ष नको देऊस, हा सल्ला तेंडुलकरने त्याला दिला.भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगनं सोमवारी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मागील दोन वर्ष मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या युवीला हा निर्णय जाहीर करताना भावनांवर नियंत्रण राखणे जड जात होतं.