मुंबई : क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या १४ व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सचिन तेंडुलकचा सुपुत्र पहिल्यांदाच आयपीएल लिलावात सामील होणार असल्याने अनेक क्रिकेट रसिकांच्या त्याच्या लिलावाकडे लक्ष्य लागलं होतं.
काही अपरिचित खेळाडूंना या लिलावात चांगली रक्कम मिळाली. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या आधारभूत किमतीत विकत घेतले.
अनकॅप खेळाडूंमध्ये अर्जुनचं नाव न आल्यानं सर्व बुचकळ्यात पडले होते. परंतु मुंबई इंडियन्सनं त्याला शॉर्ट लिस्ट करून अखेरच्या फेरीसाठी राखून ठेवले आणि लिलावातील शेवटचं नाव हे अर्जुनचंच होतं. मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली. दरम्यान, त्याच्या निवडीनंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सचिन तेंडुलकरची कन्या सारा आणि आता अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर या दोघांनीही ट्रोलर्सना उत्तर दिलं.
आता खुद्द सचिन तेंडुलकर याने देखील घराणेशाहीच्या टीकेनंतर मौन सोडलं आहे. ‘खेळाडूला त्याच्या पार्श्वभूमीमुळे नाही, तर मैदानातल्या कामगिरीमुळे ओळख मिळते,’ असं सचिन म्हणाला आहे. ‘जेव्हा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करतो, तेव्हा तुम्ही कुठून आलात? तुम्ही देशाच्या कोणत्या भागातून आलात. तुमचं कोणासोबत काय नातं आहे, या गोष्टींना महत्त्व उरत नाही. खेळाच्या मैदानात प्रत्येकासाठी परिस्थिती सारखीच असते. इकडे कामगिरीशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने फरक पडत नाही. खेळ लोकांना एकत्र आणतो. तुम्ही एक व्यक्ती म्हणून तिकडे असता. टीमसाठी योगदान द्यायचं, हेच आमच्या डोक्यात असतं.’ असं देखील त्याने स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा वाढला; महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर एसटी बसेस अडवल्या !
- पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा विनामास्क ‘रॅम्प वॉक’; सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा
- ‘शिवजयंतीला नियम, पोहरादेवीला गर्दी; हेच का समसमान वाटप?’
- ‘मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राठोड सर्मथकांचा हरताळ, आता ठाकरी बाणा दाखवून कारवाई करावी’
- ‘शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणाऱ्या महाभकास आघाडीला आज कोरोनाची भिती वाटली नाही’