#jantacurfew : कठीण प्रसंगात अविरत सेवा देणाऱ्यांचे आभार; ‘मास्टर-ब्लास्टर’कडूनही खऱ्या हिरोंचं ‘कौतुक’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशात जनता कर्फ्यूचे आवाहन सर्व नागरिकांना केले होते. त्यानुसार देशभरात आज सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला. या कर्फ्यू दरम्यान मोदींनी आज संध्याकाळी 5 वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते.

तसेच या कर्फ्यू दरम्यान मोदींनी रविवारी संध्याकाळी 5 वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते. यावेळी मोठ्या संख्येने देशातील नागरिकांनी टाळ्या आणि थाळी वाजवत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

India has shown it can come together even while staying away from each other.While we are sitting in the comfort of our homes there are many out there selflessly performing their duties.Many thanks to each and every one of you for putting us before yourself.Social distancing is something we need to practice for some time to come. The discipline and commitment we have shown against #COVID_19 needs to continue.Jai Hind! #JanataCurfew

Posted by Sachin Tendulkar on Sunday, March 22, 2020

याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. ‘आपल्या घराबाहेर येत, कठीण प्रसंगात अविरत सेवा देणाऱ्यांचे आभार मानले.’ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ सचिनने पोस्ट केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी देखील या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. त्यांनी थाळीनाद करत या सर्व सेवादात्यांना मानवंदना दिली. ट्वीटरवर त्यांच्या या व्हिडीओवर अनके लाइक्स मिळाले आहेत. पंतप्रधानांनी देखील त्यांच्या ट्वीटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.