क्रिकेट च्या देवाला चिमुरडीचे भावनिक पत्र

क्रिकेट चा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडूलकर च्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.सचिनने जरी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असली तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या मात्र किंचित देखील कमी झाली नाही.गेल्या दोन पिढ्या तर सचिन च्या चाहत्या आहेतच पण आता नवीन पिढी मध्ये देखील अनेक चाहते आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी सचिन च्या आयुष्यावर एक चित्रपट आला होता.हा चित्रपट पाहून एक  ६ वर्षाची चाहती इतकी प्रभावीत झाली की तिने सचिन ला थेट पत्रच लिहील आणि सचिन ने देखील त्यांची दखल घेतली.

ते पत्र पुढील प्रमाणे प्रिय सचिन अंकल माझे नाव तारा असून मी ६ वर्षाची आहे माझे नाव सारा दीदीसारखे तारा  आहे.मी काल तुमच्या आयुष्यावरील चित्रपट पहिला मला तो खूप आवडला.मी तुमच्या लहानपणीच्या खोड्या पाहून मी खूप हसले तर तुमचा शेवटचा सामना पाहून खूप रडले.मला तुम्हाला भेटायला आवडेल तुमच्या सोबत सारा दीदी,अर्जुन दादा आणि अंजली काकूंना भेटायला आवडेल.

Loading...