मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालावरून महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका रंगल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याला अनुसरून भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मालवणी भाषेत ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका केली होती. दरम्यान, त्यांच्या या टीकेला आता महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात सचिन सावंत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची २५ वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो’, असे सावंत म्हणाले आहेत.
शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची २५ वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो. https://t.co/wuTY7gSxJQ
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 31, 2021
दरम्यान, आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते की,’देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत’, असे शेलार म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती’
- राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु; जाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध
- ‘बेळगावच्या तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व सरकारने…’, शिवसेनेचे टीकास्त्र
- ‘त्या ‘उपऱ्या’ भाजप आमदारासाठी फडणवीसांसह संपूर्ण भाजप….’, राऊतांचा हल्लाबोल
- मुंबईत बॅनरबाजी; “नितेश राणे हरवले आहेत, माहिती देणाऱ्यास मिळणार एक कोंबडी बक्षीस”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<