fbpx

‘शिवसेनेच्या मुंबई मनपातील अत्यंत भ्रष्ट व अडाणी नेत्यांमुळे मुंबई अतिशय धोकादायक झाली’

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण  गंभीर जखमी झाले आहेत. घटनेतील जखमींवर जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पुलाच्या दुरूस्तीसाठी महापालिकेने रेल्वेकडे परवानगी मागूनही रेल्वेने ती दिली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता. यानंतर काही तासांत पालिकेने स्वत:हून हा पूल आमच्याच अखत्यारित येत असल्याची कबुली दिली. त्यामुळे आता पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान,आता याच मुद्द्यावरून कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या मुंबई मनपातील अत्यंत भ्रष्ट व अडाणी नेत्यांमुळे मुंबई अतिशय धोकादायक झाली असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. सतत लागणाऱ्या आगी व एल्फिस्टन रोड, सीएसटी पुलासारख्या दुर्घटना यातून मुंबईकर जीव मुठीत घेऊन चालतोय. ज्या मराठी माणसाच्या जीवावर सत्तेत येतात इतर समाजाबरोबर त्या मराठी माणसाचा जीवही जात आहे असं देखील सावंत यांनी म्हटलं आहे.