कर्जमाफीचा खोटेपणा उघड केल्याने फडणवीसांचा त्रागा : सचिन सावंत

मुंबई : मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुकाणू समिती आणि विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा आक्रमक भाषेत समाचार घेतला. १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करणाऱ्या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना थेट देशद्रोही मुख्यमंत्र्यांनी ठरवले. तर दुसरीकडे ३ महिन्यापूर्वी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा उल्लेख करून टीकेचे झोड उठवली.
विरोधकांच्या संघर्ष यात्रेला शेवटची सभा सोडली तर प्रत्येक सभेला एक हजार पण लोक नव्हती. माझ्या सभेत २० हजार लोक होती. मात्र, चार लोकांनी आंदोलन केले तर मीडिया म्हणते सभेत गोंधळ झाला.बंद मालगाडी समोर रेल रोको आंदोलन केले. १२ लोक मालगाडीवर चढली होती आणि मग मीडियाने बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली. शेवटी मीडियाचे दुकान पण चालले पाहिजे ना, असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मिडिया वर सुधा घसरले.
पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तिबार पेरणीच संकट राज्यातील शेतकऱ्यावर आहे. राज्यात इतिहासत प्रथमच शेतकरी संपावर गेला. अशात मुख्यमंत्री म्हणतात की संपूर्ण कर्जमाफी ही केवळ अराजकता पसरवण्याची विरोधकांची खेळी आहे. मुख्यमंत्र्यांची ही भाषा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे .
यावर आता कॉंग्रेस कडून सुधा प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. कॉंग्रेस चे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना याचे उत्तर दिले आहे. “३ महीने झाले तरी संघर्ष यात्रेवर ना टिका करावी लागते यातच सर्व काही आले. इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना संप करावा लागला”.अस म्हणत सचिन सावंत यांनी विरोधकांची संघर्ष यात्रा यशस्वी झाल्याचा दावा केलाय.