सरकार नाचतंय, प्रशासन नाचतंय मग विरोधकांनाही नाचायला बोलवा !

टीम महाराष्ट्र देशा: हा एक व्यावसायिक व्हिडिओ असून त्यात मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी गाताना आणि ताल धरताना दिसत आहेत,’ असं सांगतानाच ‘असे व्हिडिओ काढून जर राज्याचे प्रश्न सुटणार असतील तर विरोधी पक्षांनाही बोलवा. त्यांना का बाजूला ठेवता? सरकार नाचतंय, प्रशासन नाचतंय मग विरोधकांनाही नाचायला बोलवा,’ असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारला लगावला आहे.

दरम्यान, मुंबईतील नद्यांचे संवर्धन करण्याचं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या व्हिडिओवरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे. व्हिडिओसाठी टी-सिरीज या कंपनीचीच का निवड केली? मुख्यमंत्र्यांचे आणि टी-सिरीजचे काही कौटुंबीक संबंध आहेत का? सरकारशी या कंपनीचे संबंध आहेत का? या व्हिडिओसाठी किती पैसे लागले? व्हिडिओतील गायकांना मानधन दिले आहे का? किती मानधन दिले आहे? असा सवाल सावंत यांनी केला.

त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि सुधीर मुनगंटीवारजी यांना नदी पुनरुज्जीवन संकल्पना आधारित व्हिडिओमध्ये अभिनय करताना पाहून आनंद झाला. जनतेला त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल 3.5 वर्षांनंतरही जराही शंका राहिली असेल तर हा व्हिडिओ पाहून त्यांनी शंकानिरसन करून घ्यावे. असा खोचक टोला सुधा सचिन सावंत यांनी लावला आहे.

You might also like
Comments
Loading...