मुंबई: राम कदम यांनी पोरी पळवण्याची भाषा केली होती. मुंबई पोलीसांना माफिया म्हणत अवमान करणाऱ्या कंगना राणावतला झाशीची राणी म्हटले.अगोदर दोनदा पोलिसांना मारहाण करण्याचा आरोप त्यांच्यावर होता. पोलिसांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांना सोडा म्हणणाऱ्या भाजपाच्या राम कदम प्रवृत्तीचा जाहीर निषेध अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल दि. ११ रोजी घडली होती. पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका जेष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला हे कार्यकर्ते धडकले. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले.
त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर यांना ताब्यात घेऊन रिक्षाने नेत असताना नितीन खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी रिक्षातच मारहाण केली. दरम्यान पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी राम कदम यांनी पोलिसांना फोन केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राम कदम यांना एकदा तरी तुरुंगात टाका त्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही
- आंबा पिकावरील प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा
- मुख्यमंत्रीसाहेब, माझ्यासाठी पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या; वाशिमच्या युवकाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
- भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांना मारहाण; आरोपींच्या सुटकेसाठी राम कदमांचा फोन
- ‘या’ महिन्यात येऊ शकतो रेडमीचा बहुप्रतीक्षित ‘रेडमी K40’