एल्गार परिषदेच्या आयोजकांवरील कारवाई म्हणजे, चोर सोडून सन्यास्याला फाशी – कॉंग्रेस

sachin-sawant-critics-on-police-action-against-elgar-parishad-organizer

टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळीपासून देशभरात पुणे पोलसांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांची धरपकड सुरु केली आहे. यामध्ये नक्षलवादी कनेक्शन असल्याचा संशयव्यक्त करत एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर टीका करत भीमा-कोरेगाव दंगलीमध्ये एल्गार परिषदेला सरकारने दोषी ठरवणं म्हणजे चोर सोडून सन्यास्याला फाशी देण्यासारखे असल्याच कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हंटल आहे. सावंत यांनी ट्विटकरत सरकारवर निशाना साधला आहे.

दलितांच्या बद्दल मनुवादी द्वेष आणि दलित- मराठा संघर्ष निर्माण करणं ही कूट(कुटील) नीती या मागे आहे. मनोहर भिडे या संघाच्या पिलावळीवर कारवाई करा अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली आहे.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग,माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.