fbpx

योग केल्याने गरीबी दूर होईल हा तर्क लय भारी, सचिन सावंतांची मोदींवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने झारखंडच्या रांचीमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘गरिबांपर्यंत योगा पोहोचल्याने ते आजारांपासून वाचू शकतील आणि परिणामी गरिबी दूर होण्यास मदत होईल’, असे विधान केले आहे. त्यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत मोदींवर टीका केली आहे.

मोदींवर टीका करताना जबरदस्त! हा तर्क तर लय भारी! गरीबांनी योग केल्याने गरीबी दूर होईल. आजारी पडणार नाही मग खर्च वाचेल व गरीबी क्षणात दूर! काम नसेल, पोटात अन्न नसेल तरी योग करा. देशाचाही फायदा- आरोग्य सुविधा, हाताला काम देण्याचा व योजनांचा खर्च वाचला! अशा आशयाचं ट्वीट केले आहे.

तसेच, रामदेव बाबा आणि नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत या गरीबाची गरिबी गोगा करून गेली आहे आणि यात भाजपची सत्ता असलेल्या प्रत्येक राज्याचं योगदान आहे. भाजपाची सत्ता असलेल्या प्रत्येक राज्यातून या गरिबाला शेकडो एकर जमीन देण्यात येत आहे. असंही ट्वीट सावंत यांनी केले आहे.