‘मागणीत तीव्र घसरण आणि वाढ होऊन पॉवरग्रीड ना दुरुस्त होण्याचा धोका; मोदींनी नेहमीप्रमाणे डोकं न वापरता केलेलं आवाहन’

sachin sawant

टीम महाराष्ट्र देशा –  आज लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले आहे.

यासोबतच, येत्या रविवारी ५ एप्रिलला जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावं म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सचिन सावंत यांचा दावा –

आता महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दावा केला आहे कि मोदींच्या आवाहनाप्रमाणे केलं तर वीज मागणी आणि पुरवठा याच्यातील मोठ्या प्रमाणातील तफावतीमुळे पॉवर ग्रीड नादुरुस्त होण्याचा धोका आहे. ग्रीड बिघडला तर यामुळे मोठ्या भूप्रदेशातील भाग हा अंधारात जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी असाच ग्रीड देशाच्या उत्तरेत नादुरुस्त झाला होता.

सचिन सावंत ट्वीटरवर म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता लाईट बंद करण्याचं केलेलं आवाहन नेहमी प्रमाणे डोकं न वापरता केलं आहे . कोणत्याही क्षणी वापरात तीव्र घट झाल्याने ग्रीडमध्ये बिघाड होईल. म्हणून ज्या राज्यांना या अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्याविषयी चिंता आहे त्यांना अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल.

तसेच तीव्र चढउतारांना अभूतपूर्व उर्जा व्यवस्थापन आवश्यक असते, त्यातील यशाची हमी दिलेली नसते. औष्णिक जनरेटर बंद केले जाऊ शकत नाहीत. मागणीची तीव्र वाढ आणि घसरण होऊ शकते ज्यामुळे राज्यांना विनाकारण अभूतपूर्व संकटात आणले जाईल असा दावाही त्यांनी केला आहे.