Share

Sachin Sawant । “…तरी ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करताना दिलेला त्रास विसरता येणार नाही”; काँग्रेसचा भाजपला टोला

( Sachin Sawant ) मुंबई : अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) यांनी माघार घेतली असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. पराभवाच्या भीतीनेच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

भाजपाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सचिन सावंत म्हणाले की, भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी शिवसेना फोडण्याचे पाप आणि ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा मंजूर करताना त्यांना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही. यासोबतच सचिन सावंत यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.

सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान व एक मोठा कुत्रा दाखवला आहे. यात छोटा कुत्रा मोठ्या कुत्रावर भूंकत असतो. मात्र, मोठा कुत्रा भुंकताच छोटा कुंत्रा घाबरून पळ काढतो, असे दाखवले आहे. यावरून भाजप अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला घाबरल्याचा खोचक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.

“अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने उमेदवार मागे घेतला, तरी शिवसेना फोडण्याचे पाप आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना त्यांना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या संदर्भात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

( Sachin Sawant ) मुंबई : अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे उमेदवार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now