खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास केव्हाचा गमावला आहे;सचिन सावंताची जहरी टीका

sachin sawant

मुंबई – मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोप देखील मेटे यांनी केला आहे.

विनायक मेटे म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय. त्यामुळं सरकारला जागं करावं लागणार आहे. त्यासाठी आंदोलन करावंच लागणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटवावे.”

विनायक मेटे यांच्या नेतृत्वात राज्यभरातल्या ९ मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठीत झाली आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे किंवा दुसऱ्या सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी विनायक मेटेंनी केली आहे.दरम्यान, मराठा आरक्षण मुद्द्यावरुन ९ ऑगस्ट म्हणजेच उद्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही मेटेंनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला विरोध करणार असल्याचं मेटे म्हणाले.

दरम्यान,  ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण सर्वांना विश्वासात घेऊन पावलं उचलत आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत असून त्यामुळे छुपी कारस्थानं करणाऱ्या मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागलं आहे,’ असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

दरम्यान, ‘आज मराठा आरक्षणावर कोणतीही स्थगिती नाही, तसंच वकीलही पूर्वीच्याच सरकारने नेमलेले आहेत. विनायक मेटे धादांत खोटे बोलत आहेत. जनतेची दिशाभूल ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर करत आहेत. फडणवीसांच्या पायावर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणणाऱ्या मेटेंचा खरा भाजपाचा चेहरा मराठा समाज ओळखून आहे,’ अशी टीका सावंत यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी ५० बलिदाने होत असताना, उच्च न्यायालयात फडणवीस सरकारने शपथपत्र दाखल करण्यास ३ वर्ष लावली आणि शिवस्मारकात गैरव्यवहार सुरू असताना गप्प राहणाऱ्या खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास स्वत:च केव्हाचा गमावला आहे’, असंही सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’

‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’

मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला

राष्ट्रवादीच्या ‘या’ झुंजार नेत्याचे झाले कोरोनामुळे निधन; दिग्गज नेत्यांनी व्यक्त केला शोक