सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : संजय राऊत यांनी पुण्यात दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी थेट माजी खासदार उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पूरावा मागितला. म्हणून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी सांगली बंदची हाक देण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी संभाजी भिडे यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. ट्वीट करत सावंत म्हणतात, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वठवलेली प्रमुख भूमिका मनोहर भिडेंना खुपते आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊ नये, यासाठी हेच भिडे भाजपची वकिली करायला मातोश्रीवरही गेले होते. त्यामुळे आजचा सांगली बंद भाजपच्या इशाऱ्यावर आहे, हे दिसून येतंय, असे सचिन सावंत म्हणाले.

Loading...

तसेच ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ सांगली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्याच्यासाठी बंद करणे. हे जरा चुकीचे वाटत. यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसत आहे,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं होतं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या मुद्यावरुन संजय राऊत आणि उदयनराजे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर भूमिका मांडताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण