मुंबई- : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चेत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील. दरम्यान,भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत.
दरम्यान, बायडेन यांच्या विजयानंतर कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्वीट करून भाजपवर टीका केली आहे.अब की बार ट्रंप सरकार असे अमेरिकेत जाऊन बोलून तेथील अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करण्याचा आगाऊपणा करून भारताचे हित धोक्यात घालण्याचे दुष्परिणाम भारताला सहन करावे लागू नयेत मग मिळवले.माय फ्रेंड डोलांड ट्रंप आता वाचवायला येणार नाही.
"अब की बार ट्रंप सरकार" असे अमेरिकेत जाऊन बोलून तेथील अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करण्याचा आगाऊपणा करून भारताचे हित धोक्यात घालण्याचे दुष्परिणाम भारताला सहन करावे लागू नयेत मग मिळवले.माय फ्रेंड डोलांड ट्रंप आता वाचवायला येणार नाही.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 7, 2020
दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. बायडेन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला होता. मात्र या पावसातही बाइडेन यांनी जोरदार भाषण केले. गर्दी जमून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
गेल्या वर्षी सातारा येथे भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा प्रचंड गाजली होती. फ्लोरिडात डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचीही पावसात सभा झाली होती. त्यामुळे त्यांच्या विजयानंतर सोशल मीडियावर बिडेन यांचा पावसात भिजलेल्या सभेचा फोटो व्हायरल झाला असून ‘सातारा पॅटर्न’ अमेरिकेतही यशस्वी झाल्याची चर्चा सुरू आहे.
Pawar Saheb Factor Works in US Too 😀 Hard work commitment integrity leads to victory
Hopes come alive #BidenHarris2020 pic.twitter.com/dl07FAeOVm— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 7, 2020
ज्यो बायडन यांची ही सभा त्यांच्या विजयासाठी महत्वाची ठरली अशी चर्चा आहे.यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय. बायडेन यांच्या विजयानंतर आव्हाड यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये ‘पवार साहेब फॅक्टर अमेरिकेत सुद्धा यशस्वी ठरलाय. अखंडपणे केलेले कठोर परिश्रम आणि वचनबद्धता विजयी होते. आशा जिवंत आहेत असं म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- डॉक्टरांची मेहनत आली फळाला, लढवय्या पँथरने दिला कोरोनाला धोबीपछाड
- लोकशाहीचं रक्षण करा आणि कधीही क्षुल्लक समजू नका! – अमृता फडणवीस
- फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका – ठाकरे
- ‘गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे