fbpx

गांधी देशासाठी गेले, पण महाजन आणि मुंडे कशासाठी गेले? – सावंत

pramaod mahajan and gopinath munde

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. तर मोदी यांनी पलटवार करत राजीव गांधी यांचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपल्याची टीका केली आहे. मोदींच्या टीकेने विरोधापक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत.

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आता थेट भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेत भाजपवर टीका केली आहे. सावंत यांनी ट्विटकरत ‘महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी गेले… महाजन आणि मुंढे कशासाठी गेले?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

sachin sawant

मोदीजी आता कर्माची फळे भोगायला तयार रहा

मोदी यांच्या विधानावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटकरत आता युद्ध संपले असून मोदींचे कर्म त्यांची वाट पाहता आहेत, असा घणाघात केला आहे. मोदी यांनी माझ्या वडीलांमध्ये आणले तरी ते आता वाचू शकणार नाहीत, असा इशारा राहुल यांनी दिला आहे.