#पक्षांतर : ‘ज्यांना जायचंय त्यांनी लवकर जावं, काँग्रेस शुद्ध होईल’

sachin sawant

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याविषयी कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाष्य केले आहे.

सचिन सावंत सध्या औरंगाबादमध्ये आहेत. ते विधानसभेसाठी कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना ‘ज्यांना ‘तिकडे’ म्हणजे भाजप-सेनेत जायचंय त्यांनी तात्काळ जावं. त्यामुळं काँग्रेस शुद्ध होईल’ असं म्हणताना कॉंग्रेसमधून भाजप किंवा सेनेकडे होणाऱ्या पक्षांतरावर भाष्य केले आहे.

पुढे बोलताना सावंत यांनी वंचित बहुजन आघाडीचा बुरखा फाटलाय. त्यांच्यामुळं लोकसभेच्या काँग्रेसच्या किमान दहा जागांचं नुकसान झालं. त्यांचा कुणाला फायदा होतोय, हे लपून राहिलेलं नाही. अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचीही काही जबाबदारी आहे अस विधान केले आहे.

दरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या येत्या निवडणुकीत फक्त ४० जागा निवडून येतील अस विधान केले आहे. तसेच कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेलं जहाज असही महाजन म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीच्या अतंर्गत गटबाजीला कंटाळून दिली सोडचिट्टी : चित्रा वाघ

मनसे आणि वंचित हे असतील तरच महाआघाडीमध्ये येणार : राजू शेट्टी

‘रामलल्लालाही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या’,भाजप खासदाराची मागणी

भाजप-आणि शिवसेना आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत’