‘अमित शहांनी कलम ३७० वर काश्मीरमध्ये जाऊन बोलावे’

sachin sawant

टीम महाराष्ट्र देशा :जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर भाष्य करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. गोरेगाव येथील नेस्को संकुलात अमित शहा यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना शाह यांनी ‘कलम ३७० हटवण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. त्यामुळे शरद पवार आणि राहुल गांधी यांनी कलम ३७० हटवण्यास त्यांचा पाठिंबा आहे की विरोध आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला नमवले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी कौतुक केले होते अस शहांनी म्हटले आहे.

याला कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी गृहमंत्र्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर काश्मीरमध्ये जाऊन व्याख्यान द्यावं. महाराष्ट्रात कलम ३७१ आहे. कलम ३७० नाही अस विधान केले आहे. तसेच महाराष्ट्रात एवढा विकास केला आहे असं दाखवता, तर देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील रथाचे चाक चिखलात का रुतले? त्यावर बोलावे अस विधान केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या