सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी…

sachin poilt

नवी दिल्ली : राजस्थानातील कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची आज उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती रणदिपसिंह सुरजेवाल यांनी दिली आहे. तसेच पायलट यांच्याकडे जी खाती आहेत ती ही काढून घेण्यात आली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले काही वेळापूर्वी पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी राजस्थानातील कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी केली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यात जो सामना रंगला आहे. पायलट दोन दिवस झाले दिल्लीत आहेत पण, ते कोठे आहेत हे समजत नाही. ते नेमके काय करणार आहेत. त्यांनी प्रियंका गांधी किंवा राहुल गांधीशी चर्चा केल्याचे वृत्त होते पण, त्याबाबतही अधिकृत दुजोरा कोणी दिला नाही. पायलट यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करून पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांनी आतापर्यंत तसा तीनवेळा प्रयत्न केला पण, त्यांना यश आले नाही.

धाकधुक वाढणार ! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

सुरजेवाला म्हणाले, “सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि विश्वेंदर सिंह आणि रमेश मिना यांना मंत्रिपदावरुन तात्काळ काढलं जात आहे. राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदावर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह यांची नियुक्ती करण्यात येते. ते शेतकरी पुत्र असून त्यांनी शेतीच्या मशागतीसोबतच काँग्रेसची देखील मशागत केली. ते जिल्हाध्यक्ष पदावरुन इथपर्यंत आले आहेत.”

“आदिवासी सहकारी आमदार गणेश गोगरा यांना राजस्थानच्या यवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात येत आहे. हेमसिंह शेखावत यांना राजस्थान प्रदेश सेवा दलाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलंआहे,” असंही सुरजेवाला यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचं सरकार व्यक्तीवर अवलंबून नाही, तर मुल्यांवर टिकलेलं असल्याचं सांगत हे सरकार 5 वर्षे टिकेल असंही सांगितलं.

आता भाजपाने एकदा स्वतंत्र लढवूनच बघाव, जयंत पाटलांच जोरदार प्रत्युत्तर