निकालापूर्वीचं पुण्यात लागले राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर

blank

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली आहे. निकाल जाहीर होण्यास अजून २ दिवस बाकी असतानाचं पुण्यात मात्र उमेदवारांचे विजयी झाल्याबद्दल अभिनंद करणारे बॅनर लागलेले आहेत.

पुण्यात खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर लावलेले पाहायला मिळाले आहेत. निकाल जाहीर होण्याआधी हे पोस्टर्स लावले असल्याने जर दोडके यांच्यासाठी सकारात्मक निकाल लागला नाही तर मात्र त्यांचे हसू होण्याची शक्यता आहे. दोडके यांचा सामना भाजपच्या भीमराव तापकीर यांच्याशी होत आहे.

सचिन दोडके यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन शिवाजीराव दोडके यांची आमदार पदी प्रचंड बहुमतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर छापण्यात आहे. तसेच मागे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.

दरम्यान, राज्यात सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ५८.४९ टक्के मतदान झाले. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान झाले असल्याचे माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरात तब्बल ७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या