डॉ. दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी सचिन अंदुरेला, २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षानंतर दाभोळकर यांच्यावर गोळी झाडणारा मारेकरी अंदुरेला सीबीआयने काल अटक केली होती. त्यानंतर आज त्याला शिवाजीनगर कोर्टमध्ये हजर करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे स्फोटक प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईनंतर सचिन अंदुरेचे धागेदोरे सापडले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शरद कळसकरने दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याच एटीएसच्या तपासणीत पुढे आले होते. या सर्व प्रकरणाची तपासणी करणाऱ्या एटीएसने ही माहिती सीबीआयला दिली. यानंतर दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंधुरेला अटक सीबीआयने अटक केली.

20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर हत्या करण्यात आली होती. सकाळी 7 च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी दाभोळकर यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मागील पाच वर्षांपासून तपास यंत्रणांकडून त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत होता.

सनातन संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा – अशोक चव्हाण