फोटोसेशनची घाई करणाऱ्यांनी पेंग्विनचा जीव घेण्याचे काम केले – सचिन अहिर

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईच्या जिजामाता उद्यानात पेंग्विनच्या नवजात पिल्लाचा दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत बोलताना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की पेंग्विन पार्कची घोषणा करणाऱ्यांना साधे एक पेंग्विनचे पिल्लूदेखील संभाळता आले नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सचिन अहिर ?
हीच माणसे गेली चार वर्षे मोठमोठ्या घोषणा देण्याचे काम करत आहेत. सुरुवातीलाच पक्षाच्या वतीने आमचे म्हणणे होते की पेंग्विन इथल्या परिस्थितीवर मात करू शकतो का? इथल्या हवामानाच्या तुलनेत त्याचे अस्तित्व पुढे कसे राहिल ही चिंता व्यक्त केली होती. तज्ञांनी देखील यावर आक्षेप घेतला होता. दुर्दैवाने फोटोसेशनची घाई करणाऱ्या लोकांनी त्या पेंग्विनचा जीव घेण्याचे काम केले आहे. त्यामुळे पुढील आश्वासने ज्यापद्धतीने दिली जात आहेत की झेब्रा आणू, जिराफ आणू या कल्पनाच राहतील का असा प्रश्न मुंबईच्या जनतेला पडला आहे. आमच्या पैशांशी खेळू नका ही आग्रही विनंती लोकांच्या वतीने आमची सत्ताधाऱ्यांना आहे.

दीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार

सांगली : अखेर महापौरपदाची माळ संगीता खोत यांच्या गळ्यात