fbpx

माढा तर आमचाच पण इतर पाच जागांवर देखील आम्ही आग्रही – राजू शेट्टी

sharad pawar and raju shetty

टीम महाराष्ट्र देशा : माढ्यासह इतर पाच मतदारसंघ आम्ही आघाडीकडे मागितले आहेत. मात्र, आघाडी करताना सर्वच पक्षांना इच्छेनुसार त्याच जागा किंवा मागणीनुसार तेवढ्या जागा मिळतील याची शाश्वती नाही. परंतु, राज्यातील लोकसभेच्या सहा जागांबाबत आम्ही आग्रही आहोत. यामध्ये माढा, हातकणंगले, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा व वर्धा अशा सहा जागा मागितल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

फलटण येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष धनंजय महामुलकर, डॉ.रवींद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव, सचिन खानविलकर व प्रमोद गाडे, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

खा. शेट्टी म्हणाले, काही जागांमध्ये आम्ही अदलाबदल किंवा कमीजास्त जागा करू शकतो. माढा हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला असल्यामुळे या जागेबाबत आम्ही कायम आघाडी व खा. शरद पवार यांच्याकडे आग्रही राहणार आहे. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी व शेतीमालाला दीडपट हमीभाव जो पक्ष देईल किंबहुना ज्या पक्षाच्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख असेल त्या पक्षाला आमचा पाठिंबा राहिल.